Event Detail | Events & Activities | Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India

Event Detail

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Maharashtra

January 03, 2022

दिनांक 3/1/2022 रोजी राष्ट्रीय प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोणी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. तन्वी होले तर प्रमुख वक्त्या म्हणून कु. श्रुती चौधरी ह्या मंचावर विराजमान होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन विनम्र अभिवादन केले तसेच समस्त शिक्षक बंधू-भगिनींनी पुष्प वाहून प्रतिमेस वंदन केले आणि स्वागत गीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे क्रांतीसुर्य ज्योतिबा च्या वेशभूषेत कु.आराध्या सोनोने व सुरज सोनोने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई च्या वेशभूषेत कु .साक्षी खंदारे व जीविता गोल्हर यांनी ज्योतिबा सावित्री चे दर्शन घडविले.

कार्यक्रमात सुविचार , दिनविशेष , बोधकथा , प्रश्नमंजुषा , गीते , भाषणे व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चारोळ्या इत्यादीचे सादरीकरण झाले "होय मी सावित्रीबाई फुले बोलते" ह्या एकपात्री प्रयोग कु. निकिता जाधव ,कु अमृता , कु तृष्णा गोटफोडे कु साक्षी भुजाडे या विद्यार्थिनींनी सादर केला. कार्यक्रमाच्या मार्गदर्शक शिक्षिका कु प्रतिभा जीपकाटे मॅडम व कु खंदारे मॅडम होत्या. प्राचार्य भगत सरांनी कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छापर प्रतिक्रिया व्यक्त केल्या सूत्रसंचालन कुप्राची बोरखडे आणि कु प्राची गोल्हर यांनी केले तर आभार कु नंदिनी नागापुरे हिने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.

Top